Wednesday, 23 January 2019

Demat account, Trading account kai aahe ?

डिमॅट अकाउंट , ट्रेडिंग अकाउंट  काय आहे ? 




Demat account , Trading account mhanje kay ? , Demat account kai aahe ?
marketgurumarathi




नमस्कार मित्र-मैत्रिणींनो मागील ब्लॉगमध्ये आपण पहिले कि शेअर मार्केटमध्ये शेअर्स कसे येतात. चला तर मग आज समजून घेऊया  कि  डिमॅट अकाउंट , ट्रेडिंग अकाउंट  काय आहे ?  चला तर पहिले डिमॅट अकाउंट काय आहे हे पाहूया . 



डिमॅट अकाउंट काय आहे ?  डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे आहे का ? 



डिमॅट अकाउंट हे आपल्या बँकेच्या अकाउंट सारखे आहे . जसे पैशांचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आपले अकाउंट ( खाते ) असणे बंधनकारक असते अगदी तसेच जर आपल्याला शेअर्सचे व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी  डिमॅट अकाउंटची गरज असते. डिमॅट अकाउंट नसेल तर आपल्याला खरेदी केलेले शेअर्स आपल्याजवळ गुंतवणूक म्हणून ठेवता येत नाही. म्हणजेच जर एका व्यक्तीने  १ ते १० वर्षासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे ठरवले असेल तर त्याला डिमॅट अकाउंट उघडणे बंधनकारक आहे .  हो पण एक मात्र लक्षात ठेवा कि जर तुम्हाला मुत्यूअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्याची काहीही गरज नाही. ( विना डिमॅट अकाउंट म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करावी हे मी तुम्हाला पुढे  म्युच्युअल फंडच्या ब्लॉगमध्ये  सांगणारच आहे.)  आणि हो डिमॅट अकाउंट सोबतच ट्रेडिंग अकाउंट सुद्धा उघडणे गरजेचे आहे .  आता हे ट्रेडिंग अकाउंट काय आहे आणि का गरजेचे आहे ? हे आपण समजून घेऊ . 


ट्रेडिंग अकाउंट काय आहे ?



जसे वर आपण पहिले कि शेअर्स जर ३ दिवसांपेक्षा जास्त किव्हा १ ते १० वर्षासाठी  गुंतवणूक म्हणून खरेदी करायचे असतील तर आपल्याला डिमॅट अकाउंट उघडणे बंधनकारक आहे . तसेच शेअर्स गुंतवणूक म्हणून किव्हा इंट्राडे ( intra day ) ट्रेडिंग म्हणून खरेदी करायचे असल्यास ट्रेडिंग अकाउंट असणे गरजेचे आहे . कारण ट्रेडिंग अकॉउंट शिवाय आपण शेअर्स खरेदी करू शकत नाही आणि डिमॅट अकाउंट शिवाय आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला फक्त इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्याची  गरज नाही. पण जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग आणि शेअर्समध्ये गुंतवणूकही करायची असेल तर मात्र तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे आहे. तुम्ही जर कुठल्याही ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी गेलात तर तो तुम्हाला डिमॅट अकाउंट सोबतच ट्रेडिंग अकाउंट उघडून देतो . पण समजा तुम्ही फक्त ट्रेडिंगगच करणार असाल तर मात्र तुम्ही त्या ब्रोकरला फक्त ट्रेडिंग अकाउंट उघडुनद्या असे सांगू शकता त्यामुळे तुमचा मेंटेनन्स चार्ज देखील थोड्या प्रमाणात वाचेल. 



इंट्राडे ट्रेडिंग काय आहे ?



इंट्राडे ट्रेडिंग या शब्दातच त्याचा अर्थ समजतो , केलेला व्यवहार त्याच दिवशी संपवणे . म्हणजेच आज केलेला व्यवहार आजच पूर्ण करणे. 

उदा . -  समजा तुम्ही आज १०० रुपये प्रति एक शेअर या किमतीवर २० शेअर्स खरेदी केले आणि तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्स ची किंमत १०५ रुपये प्रति एक शेअर येवढी वाढली. म्हणजेच तुम्हाला ५ * २० = १०० एवढा नफा झाला. मग तुम्ही ते आज खरेदी केलेले शेअर्स आजच विकून टाकले. यालाच इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. हो पण यामध्ये जिथे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत त्या ब्रोकरचे काही कमिशन म्हणजेच ब्रोकरेज चार्जेस देखील असतात . आता हे ब्रोकरेज चार्जेस काय आहेत, ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू. आता हे डिमॅट अकाउंट उघडायचे असेल तर कसे उघडावे आणि त्यासाठी काय - काय डॉक्युमेंट्स लागतात. चला तर मग सांगतो. 


डिमॅट अकाउंट उडण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स 



डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली काही डोकमेंट्स ( कागदपत्रे ) लागतील. 

१) पॅनकार्ड
२) ऍड्रेस प्रूफ ( address proof ) आधार कार्ड , बँकेचे पासबुक वगैरे
३) फोटो
४) ३ महिन्याचे बँक स्टेटमेंट
४) १ कॅन्सल चेक
५) आणि जेवढी अमाऊंट  तुम्ही डिमॅट अकाउंटमध्ये टाकणार आहेत त्याचा एक चेक . हो पण हा अमाऊंटचा चेक देणे बंधनकारक नाही ते तुमच्यावर आहे कि तुम्हाला तो चेक द्यायचा आहे कि नाही . कारण अकॉऊंट उघडले कि तुम्ही स्वतः त्यामध्ये पैसे टाकू शकता. आणि हो हि डॉक्युमेंट्स आज म्हणजेच २३ जानेवारी २०१९ ला डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागतात तीच आहेत पण भविष्यात या डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स मध्ये बदल देखील होऊ शकतो.  कारण ते ब्रोकर वर आहे कि त्याला कुठले डॉक्युमेंट हवे आहेत डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी. त्यामुळे डिमॅट अकाउंट उघडण्याआधी ब्रोकरकडे खात्री करून घ्या कि कोण - कोणते डॉक्युमेंट्स लागतील. 



चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया कि  डिमॅट अकाउंट उघडण्याआधी कोण - कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ?  भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये .