Wednesday, 16 January 2019

shares mhanje kai ?

शेअर्स म्हणजे काय ? आणि ते असतात तरी काय ?


नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या या मराठी ब्लॉग वर आपले स्वागत आहे. आपण ह्या वेबसाईट वर शेअर मार्केट आणि त्यामधील बारकावे जाणून घेणार आहोत आणि तसेच चांगले शेअर कसे ओळखावे हे हि शिकणार आहोत. चला तर मग समजून घेऊया कि शेअर म्हणजे काय आणि हे असतात तरी काय . पण पहिले एवढे लक्षात घ्या कि शेअर म्हणजे ( गुंतवणूकदाराने )  आपण खरेदी  केलेला कंपनीतील काही हिस्सा .



समजा जसे आपण एखाद्या गावामध्ये किव्हा शहरामध्ये जमीन खरेदी करतो अगदी तसेच शेअर मार्केट मध्ये आपण कुठल्याही एका  कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो . आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल  कि कुठलीही कंपनी आपल्याला त्या कंपनीचे  शेअर्स का विकेल ? याचा त्यांना काय  फायदा ? तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे चला तर मग हे आपण एका  उदाहरणांमधून समजून घेऊया .



share mhanje kay, share mhanje kay in marathi
share mhanje kay



उदा . समजा  अ. ब.  क. नावाची एक कंपनी आहे आणि तिला तिच्या व्यवसाय वाढीसाठी / विस्तारासाठी भांडवलाची गरज आहे तर ती कंपनी दोन प्रकारे भांडवल  जमा करू शकते, एक तर बँकेतून लोन घेऊन आपल्या व्यवसाय वाढीसाठी भांडवल जमा करू शकते पण त्यासाठी त्या कंपनीला लोन म्हणून घेतलेल्या भांडवलावर व्याज द्यावे लागते . आणि दुसरा एक मार्ग म्हणून ती कंपनी जमा केलेल्या भांडवलावर  व्याज देण्यापेक्षा कंपनीतील काही हिस्सा शेअर मार्केट मधून  गुंतवणूकदारांमध्ये  विकून भांडवल गोळा करू शकते. असे केल्याने त्या कंपनीला कंपनीतील काही हिस्सा  गुंतवणूकदारांमध्ये विकून आलेल्या भांडवलावर व्याज द्यावे लागत नाही . कंपनीला हा एक मोठा फायदा असतो . ह्या कारणामुळे बहुतेक कंपन्या भांडवल जमा करण्यासाठी शेअर मार्केट मध्ये रजिस्टर होतात . पण यामध्ये आपला फायदा काय ?


आपला फायदा काय ?


यामध्ये जसा कंपनीचा फायदा आहे तसाच आपला हि फायदा आहे . आता तुम्ही विचार करत असाल  कि यामध्ये आपला फायदा कसा ? तेही सांगतो, कंपनी त्या जमा केलेल्या भांडवलाचा उपयोग तिचा व्यवसाय वाढीसाठी करते त्यामुळे कंपनीचा व्यवसाय जर वाढला तसेच  कंपनीला नफा झाला तर त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत देखील वाढते म्हणजेच गुंतवणूकदाराचाही फायदा होतो, ते हि काहीही काम न करता .


 हा पण एक मात्र खरे आहे कि जसे त्या शेअर ची किंमत वर जाते तशी ती खाली पण येते.  शेअर ची किंमत वाढली कि आपण शेअर विकून टाकतो आणि मिळालेल्या नफ्यावर आनंदी होतो तसेच जर ती कंपनी तोट्यात गेली तर त्या शेअर ची किंमत खाली येते आणि तोटा होईल या भीतीने बरेच जण आपल्या जवळील शेअर्स विकून मोकळे होतात आणि नंतर परत त्या शेअर ची किंमत वाढली कि शेअर उगाच विकले म्हणून स्वतःलाच दोष देत पचतावा करतात. यामध्ये  आपल्याला थोडा तोटाही होतो आणि भरपूर प्रमाणात नफा सुद्धा होतो. 


पण असा भरपूर नफा होण्यासाठी चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे हेच फायद्याचे ठरते. आता कोणती कंपनी चांगली हे कसे ओळखावे ? याचा  काहीहि ताण घेऊ नका तेही मी पुढे सांगणारच आहे . पण पहिले आपण शेअर मार्केट म्हणजे काय आणि तिथे आपण कसे शेअर्स खरेदी किव्हा विकू शकतो हे जाणून घेऊ या .  


No comments:

Post a Comment