share market madhe shares yetat tari kase ?
शेअर मार्केटमध्ये शेअर्स येतात तरी कसे ?
 |
| Share market marathi |
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो या आधीच्या ब्लॉग मध्ये शेअर्स म्हणजे काय ? शेअर मार्केट म्हणजे काय ? हे आपण पहिले आहे. आणि आता आपण ह्याच शेअर मार्केटमध्ये शेअर्स येतात तरी कसे ? हे आपण एका उदाहरणातून पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता समजून घेऊया.
उदा . समजा अ. ब . क . नावाची एक कंपनी आहे . आणि तिला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खूप अशा भांडवलाची गरज आहे . तेव्हा ती कंपनी दोन प्रकारच्या मार्गांनीं भांडवल उभारू शकते.
१) एक तर ती कंपनी बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभे करू शकते .
२) आणि दुसरे म्हणजे ती शेअर मार्केटमधून भांडवल उभे करू शकते .
ह्या दोघांमधील पहिला मार्ग आपण समजावून घेऊ .
१) समजा कंपनीने तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल उभारण्यासाठी पहिला मार्ग निवडला, म्हणजेच बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभारण्याचे ठरवले , तर कंपनीला बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेले सर्व भांडवल हे व्याजासकट बँकेला परत द्यावे लागेल. जे कंपनीसाठी एवढे फायद्याचे असणार नाही. आता तुम्ही म्हणाल कि यात गैर काय आहे, जे भांडवल कर्ज म्हणून घेतले ते बँकेला व्याजासकट परत करणे हे कंपनीला बंधनकारक आहे.... हो तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण जर कंपनीसमोर दुसरा फायद्याचा मार्ग असेल तर कंपनी हा मार्ग का निवडेल. आता तुम्ही म्हणाल फायद्याचा मार्ग म्हणजे ? असा कुठला फायद्याचा मार्ग आहे कंपनीकडे. चला तर मग दुसरा मार्ग पाहूया त्यामध्ये तुम्हाला सर्वकाही समजेल.
२) कंपनीसाठी फायद्याचा दुसरा मार्ग म्हणजे शेअर मार्केटमधून भांडवल उभारणे. आता कंपनी व्यवसायासाठी लागणारे एवढे भांडवल शेअर मार्केटमधून कसे उभारेल असा विचार मनात आला असेल ? तर सांगतो, समजा कंपनीला शेअर मार्केटमधून भांडवल उभारायचे आहे तर त्यासाठी कंपनीला शेअर मार्केटमध्ये रजिस्टर व्हावे लागेल. पण कंपनीला शेअर मार्केटमध्ये असे तसे रजिस्टर होता येत नाही. त्यासाठी कंपनीला सेबीने (SEBI- Securities and Exchange Board Of India) मांडलेल्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल कि हे सेबी कोण आहे ? तर आपण ते पुढे पाहणार आहोत.
पण सध्या आपण आधी हे समजून घेऊया. समजा सेबीने टाकलेल्या सर्व अटी कंपनीने पूर्ण केल्या तर सेबी त्या कंपनीला तिचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये आय.पी. ओ. ( IPO - Initial Public Offering ) च्या माध्यमातून आणण्याची परवानगी देते . ( आय.पी. ओ. काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. ) सेबीकडून कंपनीला आय.पी. ओ. आणण्याची परवानगी मिळाली कि कंपनी एक तारीख निश्चित करते आणि त्या तारीखेला कंपनीचा आय.पी. ओ. येणार आहे असे गुंतवणूकदारांमध्ये जाहीर करते. मग ती कंपनी त्या एका शेअर ची किंमत किती ठेवावी हे निश्चित करते. शेअर्सची किंमत किती ठेवावी हे कंपनी ठरवते आणि त्या प्रमाणे किमतीचा एक पट्टा ठरवला जातो. ( उदा. ९५ ते १०० हि किंमत ह्या पेक्षा जास्त सुद्धा असू शकते आणि कमी सुद्धा ) मग हे सर्व झाले कि गुंतवणूकदारांना सांगितलेल्या तारखेला त्या शेअर्सची एकप्रकारे बोली लागते .
आता हि बोली कशी लागते आणि कुठे ?
तर ऐका जशी लिलावात निघालेल्या जागेची किव्हा घराची जशी बोली लागते आणि जो जास्त किंमत देईल त्याला ती प्रॉपर्टी दिली जाते. अगदी तसेच ह्या शेअर्ससाठी लागणाऱ्या बोलीमध्ये हि होते फरक फक्त एवढाच असतो कि हि बोली ऑनलाईन असते आपल्याला प्रत्येक्षात तिथे जायची गरज नसते.
आता ऑनलाईन म्हणजे कशी ?
तर सांगतो तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या वेबसाइट वरून तुम्ही ह्या बोलीत सहभागी होऊ शकता. काही ठराविक बँका आहेत जिथे असे कंपनीचे आय.पी. ओ. ऑनलाईन खरेदी करण्याची मुभा आहे. आणि हो एक गोष्ट आजून कि ह्या शेअर्ससाठी लागणाऱ्या बोलीत आय.पी. ओ. ची किंमत हि कंपनीने ठरवून दिलेली असते त्याच किमतीत हि बोली लावावी लागते.
उदा.:- समजा कंपनीने आय.पी. ओ. ची किंमत ९५ ते १०० अशी ठेवली आहे ( शेअर्सची किंमत किती ठेवावी हे कंपनी ठरवते आणि त्या प्रमाणे किमतीचा एक पट्टा ठरवला जातो . ) तर जो जास्त पैसे देईल म्हणजेच जो आय.पी. ओ. १०० ला विकत घेईल त्यालाच हे शेअर्स म्हणजेच आय.पी. ओ. मिळतील. खूप वेळा असेच होते जेव्हा आय.पी. ओ. खरेदी करणारे जास्त असतील आणि शेअर्स कमी तर कंपनी त्यांनाच आय.पी. ओ. देते ज्यांनी जास्त किंमत दिली आहे . पण काही वेळा जर आय.पी. ओ. खरेदी करणारे कमी असतील तर मात्र तुम्ही ९५ किंमत जरी बोलीमध्ये टाकली असेल तर तुम्हालाही ते आय.पी. ओ. मिळतील . पण असे क्वचितच होते. ते सर्व गुंतवणूकदारांवर अवलंबून आहे. समजा जर तुम्हाला आय. पी. ओ. मिळाले तर प्रत्येक्षात ते तुम्हाला ज्या तारखेपर्यंत आय. पी. ओ. ची बोली चालू आहे. त्या तारखेपासून ९ ते १० दिवसांत तुमच्या डिमॅट खात्यात येतात. आता डिमॅट खाते काय आहे ? असे विचाराल तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे.
मग अशाप्रकारे गुंतवणूकदारांना शेअर्स मिळतात आणि कंपनीला तिच्या व्यवसाय वाढीसाठी भांडवल मिळते . मग आता तुम्ही म्हणाल कि यात कंपनीचा काय फायदा ? सांगतो यात कंपनीचा फायदाच-फायदा आहे. कारण जर कंपनीने बँकेकडून कर्ज काढून भांडवल उभे केले असते, तर कंपनीला ते सर्व भांडवल व्याजासकट बँकेला परत करावे लागले असते . पण शेअर मार्केटमध्ये तसे नाही, इथे कंपनीला तिचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये विकून जे भांडवल येते त्यावर कंपनीला व्याजतर द्यावे लागतच नाही पण जो पैसा भांडवल म्हणून उभा केला तो सुद्धा गुंतवणूकदारांना परत द्यावा लागत नाही . आता बोला....! आहे कि नाही फायदाच-फायदा.
आता तुम्ही म्हणाल कि यामध्ये गुंतवणूकदारांचा तर तोटाच आहे. त्यांना त्यांचे पैसे कसे काय परत मिळणार? खरे सांगावे तर यामध्येही गुंतवणूकदारांचाही फायदाच आहे. तो कसा ? तर तेही सांगतो कंपनी त्यांचे शेअर्स हे आय.पी. ओ. मार्फत गुंतवणूकदारांना देते आणि भांडवल जमा करते. मग जेव्हा भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढेल , कंपनीची प्रगती होईल तसे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत देखील वाढेल . मग असे किंमत वाढलेले शेअर्स गुंतवणूकदार दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकतील आणि त्यांना त्यांनी गुंतवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळतील . म्हणजेच त्यांना फायदाही होईल . आता समजले कि कसा दोघांनाही याचा फायदा आहे.
आता पुढे आपण डिमॅट काय आहे ? आय. पी. ओ. म्हणजे काय ? सेबी कोण आहे ? अशा बऱ्याच बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया.
No comments:
Post a Comment