डिमॅट अकाउंट , ट्रेडिंग अकाउंट काय आहे ?
 |
| marketgurumarathi |
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो मागील ब्लॉगमध्ये आपण पहिले कि शेअर मार्केटमध्ये शेअर्स कसे येतात. चला तर मग आज समजून घेऊया कि डिमॅट अकाउंट , ट्रेडिंग अकाउंट काय आहे ? चला तर पहिले डिमॅट अकाउंट काय आहे हे पाहूया .
डिमॅट अकाउंट काय आहे ? डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे आहे का ?
डिमॅट अकाउंट हे आपल्या बँकेच्या अकाउंट सारखे आहे . जसे पैशांचे व्यवहार करण्यासाठी आपल्याला बँकेमध्ये आपले अकाउंट ( खाते ) असणे बंधनकारक असते अगदी तसेच जर आपल्याला शेअर्सचे व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी डिमॅट अकाउंटची गरज असते. डिमॅट अकाउंट नसेल तर आपल्याला खरेदी केलेले शेअर्स आपल्याजवळ गुंतवणूक म्हणून ठेवता येत नाही. म्हणजेच जर एका व्यक्तीने १ ते १० वर्षासाठी शेअर्समध्ये गुंतवणूक करायचे ठरवले असेल तर त्याला डिमॅट अकाउंट उघडणे बंधनकारक आहे . हो पण एक मात्र लक्षात ठेवा कि जर तुम्हाला मुत्यूअल फंडच्या माध्यमातून गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्याची काहीही गरज नाही. ( विना डिमॅट अकाउंट म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक करावी हे मी तुम्हाला पुढे म्युच्युअल फंडच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे.) आणि हो डिमॅट अकाउंट सोबतच ट्रेडिंग अकाउंट सुद्धा उघडणे गरजेचे आहे . आता हे ट्रेडिंग अकाउंट काय आहे आणि का गरजेचे आहे ? हे आपण समजून घेऊ .
ट्रेडिंग अकाउंट काय आहे ?
जसे वर आपण पहिले कि शेअर्स जर ३ दिवसांपेक्षा जास्त किव्हा १ ते १० वर्षासाठी गुंतवणूक म्हणून खरेदी करायचे असतील तर आपल्याला डिमॅट अकाउंट उघडणे बंधनकारक आहे . तसेच शेअर्स गुंतवणूक म्हणून किव्हा इंट्राडे ( intra day ) ट्रेडिंग म्हणून खरेदी करायचे असल्यास ट्रेडिंग अकाउंट असणे गरजेचे आहे . कारण ट्रेडिंग अकॉउंट शिवाय आपण शेअर्स खरेदी करू शकत नाही आणि डिमॅट अकाउंट शिवाय आपण शेअर्समध्ये गुंतवणूक करू शकत नाही. त्यामुळे जर तुम्हाला फक्त इंट्राडे ट्रेडिंग करायची असेल तर तुम्हाला डिमॅट अकाउंट उघडण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला इंट्राडे ट्रेडिंग आणि शेअर्समध्ये गुंतवणूकही करायची असेल तर मात्र तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट उघडणे गरजेचे आहे. तुम्ही जर कुठल्याही ब्रोकर कडे डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी गेलात तर तो तुम्हाला डिमॅट अकाउंट सोबतच ट्रेडिंग अकाउंट उघडून देतो . पण समजा तुम्ही फक्त ट्रेडिंगगच करणार असाल तर मात्र तुम्ही त्या ब्रोकरला फक्त ट्रेडिंग अकाउंट उघडुनद्या असे सांगू शकता त्यामुळे तुमचा मेंटेनन्स चार्ज देखील थोड्या प्रमाणात वाचेल.
इंट्राडे ट्रेडिंग काय आहे ?
इंट्राडे ट्रेडिंग या शब्दातच त्याचा अर्थ समजतो , केलेला व्यवहार त्याच दिवशी संपवणे . म्हणजेच आज केलेला व्यवहार आजच पूर्ण करणे.
उदा . - समजा तुम्ही आज १०० रुपये प्रति एक शेअर या किमतीवर २० शेअर्स खरेदी केले आणि तुम्ही खरेदी केलेल्या शेअर्स ची किंमत १०५ रुपये प्रति एक शेअर येवढी वाढली. म्हणजेच तुम्हाला ५ * २० = १०० एवढा नफा झाला. मग तुम्ही ते आज खरेदी केलेले शेअर्स आजच विकून टाकले. यालाच इंट्राडे ट्रेडिंग म्हणतात. हो पण यामध्ये जिथे तुम्ही ट्रेडिंग अकाउंट आणि डिमॅट अकाउंट ओपन केलेले आहेत त्या ब्रोकरचे काही कमिशन म्हणजेच ब्रोकरेज चार्जेस देखील असतात . आता हे ब्रोकरेज चार्जेस काय आहेत, ते आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पाहू. आता हे डिमॅट अकाउंट उघडायचे असेल तर कसे उघडावे आणि त्यासाठी काय - काय डॉक्युमेंट्स लागतात. चला तर मग सांगतो.
डिमॅट अकाउंट उडण्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स
डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी तुम्हाला खालील प्रमाणे दिलेली काही डोकमेंट्स ( कागदपत्रे ) लागतील.
१) पॅनकार्ड
२) ऍड्रेस प्रूफ ( address proof ) आधार कार्ड , बँकेचे पासबुक वगैरे
३) फोटो
४) ३ महिन्याचे बँक स्टेटमेंट
४) १ कॅन्सल चेक
५) आणि जेवढी अमाऊंट तुम्ही डिमॅट अकाउंटमध्ये टाकणार आहेत त्याचा एक चेक . हो पण हा अमाऊंटचा चेक देणे बंधनकारक नाही ते तुमच्यावर आहे कि तुम्हाला तो चेक द्यायचा आहे कि नाही . कारण अकॉऊंट उघडले कि तुम्ही स्वतः त्यामध्ये पैसे टाकू शकता. आणि हो हि डॉक्युमेंट्स आज म्हणजेच २३ जानेवारी २०१९ ला डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागतात तीच आहेत पण भविष्यात या डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी लागणाऱ्या डॉक्युमेंट्स मध्ये बदल देखील होऊ शकतो. कारण ते ब्रोकर वर आहे कि त्याला कुठले डॉक्युमेंट हवे आहेत डिमॅट अकाउंट उघडण्यासाठी. त्यामुळे डिमॅट अकाउंट उघडण्याआधी ब्रोकरकडे खात्री करून घ्या कि कोण - कोणते डॉक्युमेंट्स लागतील.
चला तर मग आजच्या ब्लॉगमध्ये एवढेच पुढच्या ब्लॉग मध्ये बघूया कि डिमॅट अकाउंट उघडण्याआधी कोण - कोणत्या गोष्टी लक्षात घ्याव्यात ? भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये .
शेअर मार्केटमध्ये शेअर्स येतात तरी कसे ?
 |
| Share market marathi |
नमस्कार मित्र-मैत्रिणींनो या आधीच्या ब्लॉग मध्ये शेअर्स म्हणजे काय ? शेअर मार्केट म्हणजे काय ? हे आपण पहिले आहे. आणि आता आपण ह्याच शेअर मार्केटमध्ये शेअर्स येतात तरी कसे ? हे आपण एका उदाहरणातून पाहणार आहोत. चला तर मग वेळ वाया न घालवता समजून घेऊया.
उदा . समजा अ. ब . क . नावाची एक कंपनी आहे . आणि तिला आपला व्यवसाय वाढवण्यासाठी खूप अशा भांडवलाची गरज आहे . तेव्हा ती कंपनी दोन प्रकारच्या मार्गांनीं भांडवल उभारू शकते.
१) एक तर ती कंपनी बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभे करू शकते .
२) आणि दुसरे म्हणजे ती शेअर मार्केटमधून भांडवल उभे करू शकते .
ह्या दोघांमधील पहिला मार्ग आपण समजावून घेऊ .
१) समजा कंपनीने तिचा व्यवसाय वाढवण्यासाठी भांडवल उभारण्यासाठी पहिला मार्ग निवडला, म्हणजेच बँकेकडून कर्ज घेऊन भांडवल उभारण्याचे ठरवले , तर कंपनीला बँकेकडून कर्ज म्हणून घेतलेले सर्व भांडवल हे व्याजासकट बँकेला परत द्यावे लागेल. जे कंपनीसाठी एवढे फायद्याचे असणार नाही. आता तुम्ही म्हणाल कि यात गैर काय आहे, जे भांडवल कर्ज म्हणून घेतले ते बँकेला व्याजासकट परत करणे हे कंपनीला बंधनकारक आहे.... हो तुमचे म्हणणे बरोबर आहे. पण जर कंपनीसमोर दुसरा फायद्याचा मार्ग असेल तर कंपनी हा मार्ग का निवडेल. आता तुम्ही म्हणाल फायद्याचा मार्ग म्हणजे ? असा कुठला फायद्याचा मार्ग आहे कंपनीकडे. चला तर मग दुसरा मार्ग पाहूया त्यामध्ये तुम्हाला सर्वकाही समजेल.
२) कंपनीसाठी फायद्याचा दुसरा मार्ग म्हणजे शेअर मार्केटमधून भांडवल उभारणे. आता कंपनी व्यवसायासाठी लागणारे एवढे भांडवल शेअर मार्केटमधून कसे उभारेल असा विचार मनात आला असेल ? तर सांगतो, समजा कंपनीला शेअर मार्केटमधून भांडवल उभारायचे आहे तर त्यासाठी कंपनीला शेअर मार्केटमध्ये रजिस्टर व्हावे लागेल. पण कंपनीला शेअर मार्केटमध्ये असे तसे रजिस्टर होता येत नाही. त्यासाठी कंपनीला सेबीने (SEBI- Securities and Exchange Board Of India) मांडलेल्या सर्व अटी पूर्ण कराव्या लागतील. आता तुम्ही म्हणाल कि हे सेबी कोण आहे ? तर आपण ते पुढे पाहणार आहोत.
पण सध्या आपण आधी हे समजून घेऊया. समजा सेबीने टाकलेल्या सर्व अटी कंपनीने पूर्ण केल्या तर सेबी त्या कंपनीला तिचे शेअर्स शेअर मार्केटमध्ये आय.पी. ओ. ( IPO - Initial Public Offering ) च्या माध्यमातून आणण्याची परवानगी देते . ( आय.पी. ओ. काय आहे हे आपण पुढे पाहणार आहोत. ) सेबीकडून कंपनीला आय.पी. ओ. आणण्याची परवानगी मिळाली कि कंपनी एक तारीख निश्चित करते आणि त्या तारीखेला कंपनीचा आय.पी. ओ. येणार आहे असे गुंतवणूकदारांमध्ये जाहीर करते. मग ती कंपनी त्या एका शेअर ची किंमत किती ठेवावी हे निश्चित करते. शेअर्सची किंमत किती ठेवावी हे कंपनी ठरवते आणि त्या प्रमाणे किमतीचा एक पट्टा ठरवला जातो. ( उदा. ९५ ते १०० हि किंमत ह्या पेक्षा जास्त सुद्धा असू शकते आणि कमी सुद्धा ) मग हे सर्व झाले कि गुंतवणूकदारांना सांगितलेल्या तारखेला त्या शेअर्सची एकप्रकारे बोली लागते .
आता हि बोली कशी लागते आणि कुठे ?
तर ऐका जशी लिलावात निघालेल्या जागेची किव्हा घराची जशी बोली लागते आणि जो जास्त किंमत देईल त्याला ती प्रॉपर्टी दिली जाते. अगदी तसेच ह्या शेअर्ससाठी लागणाऱ्या बोलीमध्ये हि होते फरक फक्त एवढाच असतो कि हि बोली ऑनलाईन असते आपल्याला प्रत्येक्षात तिथे जायची गरज नसते.
आता ऑनलाईन म्हणजे कशी ?
तर सांगतो तुमचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेच्या वेबसाइट वरून तुम्ही ह्या बोलीत सहभागी होऊ शकता. काही ठराविक बँका आहेत जिथे असे कंपनीचे आय.पी. ओ. ऑनलाईन खरेदी करण्याची मुभा आहे. आणि हो एक गोष्ट आजून कि ह्या शेअर्ससाठी लागणाऱ्या बोलीत आय.पी. ओ. ची किंमत हि कंपनीने ठरवून दिलेली असते त्याच किमतीत हि बोली लावावी लागते.
उदा.:- समजा कंपनीने आय.पी. ओ. ची किंमत ९५ ते १०० अशी ठेवली आहे ( शेअर्सची किंमत किती ठेवावी हे कंपनी ठरवते आणि त्या प्रमाणे किमतीचा एक पट्टा ठरवला जातो . ) तर जो जास्त पैसे देईल म्हणजेच जो आय.पी. ओ. १०० ला विकत घेईल त्यालाच हे शेअर्स म्हणजेच आय.पी. ओ. मिळतील. खूप वेळा असेच होते जेव्हा आय.पी. ओ. खरेदी करणारे जास्त असतील आणि शेअर्स कमी तर कंपनी त्यांनाच आय.पी. ओ. देते ज्यांनी जास्त किंमत दिली आहे . पण काही वेळा जर आय.पी. ओ. खरेदी करणारे कमी असतील तर मात्र तुम्ही ९५ किंमत जरी बोलीमध्ये टाकली असेल तर तुम्हालाही ते आय.पी. ओ. मिळतील . पण असे क्वचितच होते. ते सर्व गुंतवणूकदारांवर अवलंबून आहे. समजा जर तुम्हाला आय. पी. ओ. मिळाले तर प्रत्येक्षात ते तुम्हाला ज्या तारखेपर्यंत आय. पी. ओ. ची बोली चालू आहे. त्या तारखेपासून ९ ते १० दिवसांत तुमच्या डिमॅट खात्यात येतात. आता डिमॅट खाते काय आहे ? असे विचाराल तर ते मी पुढच्या ब्लॉगमध्ये सांगणारच आहे.
मग अशाप्रकारे गुंतवणूकदारांना शेअर्स मिळतात आणि कंपनीला तिच्या व्यवसाय वाढीसाठी भांडवल मिळते . मग आता तुम्ही म्हणाल कि यात कंपनीचा काय फायदा ? सांगतो यात कंपनीचा फायदाच-फायदा आहे. कारण जर कंपनीने बँकेकडून कर्ज काढून भांडवल उभे केले असते, तर कंपनीला ते सर्व भांडवल व्याजासकट बँकेला परत करावे लागले असते . पण शेअर मार्केटमध्ये तसे नाही, इथे कंपनीला तिचे शेअर्स गुंतवणूकदारांमध्ये विकून जे भांडवल येते त्यावर कंपनीला व्याजतर द्यावे लागतच नाही पण जो पैसा भांडवल म्हणून उभा केला तो सुद्धा गुंतवणूकदारांना परत द्यावा लागत नाही . आता बोला....! आहे कि नाही फायदाच-फायदा.
आता तुम्ही म्हणाल कि यामध्ये गुंतवणूकदारांचा तर तोटाच आहे. त्यांना त्यांचे पैसे कसे काय परत मिळणार? खरे सांगावे तर यामध्येही गुंतवणूकदारांचाही फायदाच आहे. तो कसा ? तर तेही सांगतो कंपनी त्यांचे शेअर्स हे आय.पी. ओ. मार्फत गुंतवणूकदारांना देते आणि भांडवल जमा करते. मग जेव्हा भविष्यात कंपनीचा व्यवसाय वाढेल , कंपनीची प्रगती होईल तसे त्या कंपनीच्या शेअर्सची किंमत देखील वाढेल . मग असे किंमत वाढलेले शेअर्स गुंतवणूकदार दुसऱ्या गुंतवणूकदारांना विकतील आणि त्यांना त्यांनी गुंतवलेल्या पैशांपेक्षा जास्त पैसे मिळतील . म्हणजेच त्यांना फायदाही होईल . आता समजले कि कसा दोघांनाही याचा फायदा आहे.
आता पुढे आपण डिमॅट काय आहे ? आय. पी. ओ. म्हणजे काय ? सेबी कोण आहे ? अशा बऱ्याच बाबी जाणून घेणार आहोत. चला तर मग पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया.
शेअर मार्केट म्हणजे काय ?
 |
| Marketgurumarathi |
शेअर मार्केटमध्ये स्टॉक मार्केटलाच कॅश मार्केट आणि इक्विटी मार्केट अश्या वेगवेगळ्या नावांनी संभोधले जाते त्यामुळे अशी वेगवेगळी नावे जर कोणाकडून ऐकलीत तर गडबडून जाऊ नका . फक्त एवढेच लक्षात ठेवा कि नावे वेगवेगळी आहेत अर्थ मात्र एकच आहे. नावावरूनच आपल्याला समजते कि इथे वेगवेगळ्या कंपन्यांच्या शेअर्स ची खरेदी विक्री होते, जसा गावाकडे आठवडा बाजार भरतो तेव्हा तिथे आपण आपल्याला ज्या वस्तू पाहिजे आहेत त्या आपण खरेदी करतो आणि ज्याला ज्या वस्तू विकायच्या आहेत तो त्या विकतो. अगदी तसेच शेअर बाजार ( मार्केट ) मध्ये आपण आपल्याला जे शेअर्स खरेदी करायचे असतील ते खरेदी करतो आणि जे विकायचे असतील ते विकतो. पण जसा आठवडा बाजार आठवड्यातून एकदा भरतो तसे शेअर बाजार हे आठवड्यातून पाच दिवस चालू असते. शनिवार आणि रविवार शेअर बाजार बंद असतो .
शेअर मार्केट मध्ये ऐकून तीन प्रकार मोडतात .
१) स्टॉक मार्केट
२) डेरीवेटीव्ह मार्केट आणि
३) कमोडिटी मार्केट
१) स्टॉक मार्केट :-
स्टॉक मार्केटलाच आपण ईक्वीटी मार्केट किंवा कॅश मार्केटअसे म्हणतो . इथे आपल्याला ज्या कंपन्या शेअर मार्केट मध्ये रजिस्टर आहेत त्या कंपन्यांचे शेअर्स खरेदी आणि विक्री करता येते.
२) डेरीवेटीव्ह मार्केट :-
 |
| MarketGuruMarathi |
डेरिव्हेटीव्ह मार्केटमध्ये आपण स्टॉक आणि इंडेक्स चे ऑपशन्स खरेदी करू शकतो तसेच विकू हि शकतो . आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कि हे ऑपशन्स म्हणजे काय ? चिंता करू नका ते मी तुम्हाला सांगणारच आहे पण आता नाही ,आता आपण फक्त शेअर मार्केट विषयी जाणून घेणार आहोत.
३) कमोडिटी मार्केट :-
जसे स्टॉक मार्केटमध्ये आपण कंपनीचे शेअर्स खरेदी करतो अगदी तसेच आपण कमोडिटी मार्केटमध्ये गहू ,बाजरी,सोने असे बरेच काही खरेदी करू शकतो . आणि हो ते पण इलेक्ट्रॉनिक फॉर्म मध्ये, म्हणजेच जसे दुकानातून गहू , बाजरी आणि सोनं घेतो तसे नाही. इथे आपण त्यांचे शेअर्स घेत असतो .एवढे लक्षात ठेवा कि जगामध्ये सर्व प्रथम शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग हि कमोडिटी मार्केटच्या माध्यमातून सुरु झाली होती आणि ती हे जपान मध्ये . त्यामुळे शेअर बाजारात कमोडिटी मार्केट हे खूप जुने आहे .मग नंतर जसे आधुनिकरण होत गेले तश्या कंपन्या हि शेअर मार्केटच्या माध्यमातून स्टॉक मार्केट मध्ये ट्रेड होऊ लागल्या .
शेअर्स म्हणजे काय ? आणि ते असतात तरी काय ?
नमस्कार मित्र मैत्रिणींनो आपल्या या मराठी ब्लॉग वर आपले स्वागत आहे. आपण ह्या वेबसाईट वर शेअर मार्केट आणि त्यामधील बारकावे जाणून घेणार आहोत आणि तसेच चांगले शेअर कसे ओळखावे हे हि शिकणार आहोत. चला तर मग समजून घेऊया कि शेअर म्हणजे काय आणि हे असतात तरी काय . पण पहिले एवढे लक्षात घ्या कि शेअर म्हणजे ( गुंतवणूकदाराने ) आपण खरेदी केलेला कंपनीतील काही हिस्सा .
समजा जसे आपण एखाद्या गावामध्ये किव्हा शहरामध्ये जमीन खरेदी करतो अगदी तसेच शेअर मार्केट मध्ये आपण कुठल्याही एका कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकतो . आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल कि कुठलीही कंपनी आपल्याला त्या कंपनीचे शेअर्स का विकेल ? याचा त्यांना काय फायदा ? तुमचा हा प्रश्न अगदी बरोबर आहे चला तर मग हे आपण एका उदाहरणांमधून समजून घेऊया .
 |
| share mhanje kay |
उदा . समजा अ. ब. क. नावाची एक कंपनी आहे आणि तिला तिच्या व्यवसाय वाढीसाठी / विस्तारासाठी भांडवलाची गरज आहे तर ती कंपनी दोन प्रकारे भांडवल जमा करू शकते, एक तर बँकेतून लोन घेऊन आपल्या व्यवसाय वाढीसाठी भांडवल जमा करू शकते पण त्यासाठी त्या कंपनीला लोन म्हणून घेतलेल्या भांडवलावर व्याज द्यावे लागते . आणि दुसरा एक मार्ग म्हणून ती कंपनी जमा केलेल्या भांडवलावर व्याज देण्यापेक्षा कंपनीतील काही हिस्सा शेअर मार्केट मधून गुंतवणूकदारांमध्ये विकून भांडवल गोळा करू शकते. असे केल्याने त्या कंपनीला कंपनीतील काही हिस्सा गुंतवणूकदारांमध्ये विकून आलेल्या भांडवलावर व्याज द्यावे लागत नाही . कंपनीला हा एक मोठा फायदा असतो . ह्या कारणामुळे बहुतेक कंपन्या भांडवल जमा करण्यासाठी शेअर मार्केट मध्ये रजिस्टर होतात . पण यामध्ये आपला फायदा काय ?
आपला फायदा काय ?
यामध्ये जसा कंपनीचा फायदा आहे तसाच आपला हि फायदा आहे . आता तुम्ही विचार करत असाल कि यामध्ये आपला फायदा कसा ? तेही सांगतो, कंपनी त्या जमा केलेल्या भांडवलाचा उपयोग तिचा व्यवसाय वाढीसाठी करते त्यामुळे कंपनीचा व्यवसाय जर वाढला तसेच कंपनीला नफा झाला तर त्या कंपनीच्या शेअर्स ची किंमत देखील वाढते म्हणजेच गुंतवणूकदाराचाही फायदा होतो, ते हि काहीही काम न करता .
हा पण एक मात्र खरे आहे कि जसे त्या शेअर ची किंमत वर जाते तशी ती खाली पण येते. शेअर ची किंमत वाढली कि आपण शेअर विकून टाकतो आणि मिळालेल्या नफ्यावर आनंदी होतो तसेच जर ती कंपनी तोट्यात गेली तर त्या शेअर ची किंमत खाली येते आणि तोटा होईल या भीतीने बरेच जण आपल्या जवळील शेअर्स विकून मोकळे होतात आणि नंतर परत त्या शेअर ची किंमत वाढली कि शेअर उगाच विकले म्हणून स्वतःलाच दोष देत पचतावा करतात. यामध्ये आपल्याला थोडा तोटाही होतो आणि भरपूर प्रमाणात नफा सुद्धा होतो.
पण असा भरपूर नफा होण्यासाठी चांगल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करणे हेच फायद्याचे ठरते. आता कोणती कंपनी चांगली हे कसे ओळखावे ? याचा काहीहि ताण घेऊ नका तेही मी पुढे सांगणारच आहे . पण पहिले आपण शेअर मार्केट म्हणजे काय आणि तिथे आपण कसे शेअर्स खरेदी किव्हा विकू शकतो हे जाणून घेऊ या .